न्यायाधीय लोया मृत्यू प्रकरणी विरोधक एकत्र; एसआयटी चौकशीची मागणी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

न्यायाधीय लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत व्हावी अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. या मागणीसाठी विरोधीपक्ष नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची शुक्रवारी भेट घेतली. न्यायाधीय लोया यांच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी १५ राजकीय पक्षांच्या ११४ खासदारांनी एका अर्जावर सह्या केल्या आहेत.

या संपूर्ण विषयावर बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, ‘न्या. लोया यांचा मृत्यू हा संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. या चौकशीसाठी १५ राजकीय पक्षांच्या १४४ खासदारांनी एका अर्जावर सह्या केल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण या प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी करीत आहोत.’

सुप्रीम कोर्टात न्यायाधीश लोया यांच्या मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणीही सुरू आहे. एसआयटीवर सर्वोच्च न्यायालयाची देखरेख असावी अशीही मागणी खासदारांनी केली आहे.