जस्टिन बिबर १० मे रोजी मुंबईत येणार


सामना ऑनलाईन । मुंबई

जगप्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बिबर याच्या मुंबईतील चाहत्यांसाठी एक खुषखबर आहे. जस्टिन येत्या १० मे रोजी मुंबईत येणार असून नवी मुंबईतील डि.वाय. पाटील स्टेडियमवर त्याचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे. जस्टिनचा कॉन्सर्ट आयोजित करणाऱ्या व्हाईट फॉक्स इंडियाचे संचालक अरुण जैन यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.

जस्टिन सध्या त्याच्या ‘बिबर पर्पज टूर’ अंतर्गत आशिया खंडाच्या दौऱ्यावर आहे. सुरवातीला तो आशियातील फक्त तेल अवीव व दुबई या शहरांनाच भेट देणार होता. मात्र नंतर त्याच्या कार्यक्रमात बदल करुन मुंबईत देखील त्याचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे.