आपणच आहोत महालक्ष्मी!

>>ज्योत्स्ना गाडगीळ<<

आताच्या वैभवलक्ष्मी मेरी कोम, चंदा कोचर, किरण बेदी, रश्मी करंदीकर, अरुंधती भट्टाचार्य ही नावे आपल्याला सुशिलाची आठवण करून देतात. त्यांना आपापल्या क्षेत्रात महप्रयासाने वैभवलक्ष्मी कधीच प्राप्त झाली आहे. ती केवळ संपत्तीच्या स्वरूपात नाही, तर यश, आरोग्य, समाधान, पद, प्रतिष्ठा या स्वरूपातही! ‘तुम्हारी सुलू’ हा चित्रपट सुशिलाची आठवण करून देतो. मिळालेल्या संधीचे सोने करून स्वतःची ओळख निर्माण करणारी सुलू कौटुंबिक अडचणींमुळे आवड बाजूला ठेवते आणि पुन्हा संसारात रमते.

१९७५ साली प्रदर्शित झालेला ‘जय संतोषी माँ’ हा चित्रपट लो बजेट असूनही त्या काळात बॉक्स ऑफिसवर पाच कोटींची कमाई करू शकला. रामायण-महाभारत मालिकेनंतर या पौराणिक चित्रपटाने प्रेक्षकांवर गारुड घातले. कानन कौशल ही सत्यवतीची भूमिका केलेली नायिका बायकांना क्रतकथांमधली नायिका वाटू लागली, तर संतोषी माता झालेली अनिता गुहा पोथीतली महालक्ष्मी!

याच सुमारास वैभवलक्ष्मी व्रताची संकल्पना रूढ झाली. सुशिला नावाच्या गृहकृत्यदक्ष स्त्रीची लोककथा वाऱयासारखी पसरली. सुखासुखी चाललेला तिचा संसार कालांतराने अंधारात लोटला गेला आणि एका साधूबाबांच्या सांगण्यावरून तिने मार्गशिर्ष महिन्यातल्या चार शुक्रवारी देवीची मनोभावे उपासना केली आणि तिचे गतवैभव परत आले. हे ऐकून समस्त स्त्रीवर्ग वैभवलक्ष्मीचे व्रत करू लागला. त्याआधी मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवारी फक्त महालक्ष्मी व्रत केले जात होते. महालक्ष्मी व्रताची पौराणिक कथाही जवळपास अशाच आशयाची आहे, ती वेगळी सांगायला नको!

परिस्थितीचा माज करू नये, हे महालक्ष्मीचे व्रत सांगते, तर आलेल्या परिस्थितीला सामोरे जा, हे वैभवलक्ष्मीचे व्रत सांगते. मार्गशीर्ष महिन्यातील या दोन्ही कथांकडे आपण फक्त देवभोळेपणाने पाहतो, डोळसपणे पाहत नाही. खरे पाहता त्या कथांच्या नायिका आपल्या अवतीभोवतीच असतात, कदाचित आपणही त्यांच्यापैकी एक असतो, मात्र त्यादृष्टीने आपण विचार करत नाही.

सद्यःस्थितीत टीव्ही मालिकांच्या नायिका फारच सोशिक, सरळ, स्नेहार्द्र दाखवल्या जातात आणि त्यांचे वागणे आदर्श (?) ठरवले जाते. विरंगुळा म्हणून समस्त माता-भगिनी चवीने त्या मालिका पाहतात, परंतु काही स्त्रीया खरोखरीच सोशिक,सरळ, स्नेहार्द्र असूनही वैभवलक्ष्मी कथेतल्या सुशीलाप्रमाणे धडाडीच्या असतात. आकाशाला हात लागले, तरी पाय जमिनीवर स्थिर ठेवतात. थोडक्यात काय, तर क्रत कथांमधील नायिका आपल्यातच दडल्या आहेत. मग कथेनुसार व्रत आचरायचे तर, केवळ उपासान भागणार नाही, तर व्रतस्थ व्हावे लागेल.

  • Devraj Shastri

    +91-9166008103किया-कराया, प्रेम-विवाह, सौतन दुख, व्यापार, गृहक्लेश, दुश्मन से छुटकारा, वशीकरण, गृहक्लेश,