भिवंडीत कबड्डीपटूची आत्महत्या

सामना ऑनलाईन । भिवंडी

भिवंडीतील कालवार येथील एका तरुणाने घरच्या टेरेसवर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. खुशाल दशरथ म्हात्रे (२४) असे त्याचे नाव असून तो उदयोन्मुख कबड्डीपटू म्हणून परिसरात परिचित होता.

खुशाल याने कुमार गटात राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या खेळाची चुणूक दाखवली होती. लवकरच प्रो-कबड्डीच्या संघात प्रवेश करण्याचे त्याचे स्वप्न होते. शनिवारी सायंकाळी त्याने आईला कब्बडीची प्रॅक्टिस करण्यासाठी जात असल्याचे सांगून गळ्यातील चेन काढून दिली आणि घरच्या टेरेसवर जाऊन पाइपालाला दोरी बांधत गळफास घेऊन आत्महत्या केली.