तनुजा ठणठणीत; प्रकृतीत सुधारणा

31

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा गेल्या काही दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. तनुजा यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्यांची मुलगी अभिनेत्री काजोल हिने ट्विटरवरून दिली आहे. तनुजा यांना पोटाशी संबंधित डायव्हर्टिक्यूलीस नावाचा आजार झाला होता. त्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. डायव्हर्टिक्यूलीस या आजारावर नुकतीच सर्जरी करण्यात आली असून त्यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा होत आहे. काजोलने नुकताच ट्विटरवर आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘आईच्या तब्येतीसाठी ज्या लोकांनी प्रार्थना केल्या त्या सगळ्यांचे मी आभार मानते’ अशी कॅप्शन तिने फोटोसोबत दिली आहे. काजोलने शेअर केलेल्या या फोटोत तनुजा आणि काजोल हसताना दिसत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या