उड्डाणपुलाचे काम सुरू असताना अपघात, पाच जखमी

सामना प्रतिनिधी । कंळबोली

कळंबोली-जेएनपीटी मार्गावर चिंचपाडा येथे नव्या उड्डाणपुलाचे काम सुरू असताना लोखंडी सळ्यांचा सांगाडा कोसळला आहे. या अपघातामध्ये पाच कामगार जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी दुपारी घडली. जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शनिवारी दुपारी उड्डाणपुलासाठी लागणा-या लोखंडी सळ्यांचा सांगाडा चढवण्याचे काम सुरू होते. काम सुरू असताना हा सांगाडा आणि त्यासोबत असलेले पत्रे खाली कोसळले. यावेळी त्या ठिकाणी काम करणारे पाच कामगारी जखमी झाले आहेत.

kalamboli