महामार्गावरील खड्ड्यांमुळे बस-बाईक अपघात, पती-पत्नी जागीच ठार

road-accident-nagar-pathardi

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

नगर येथे कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर बस खाली आल्यानं बाईकवर असलेल्या पती आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावरील खराबरस्ते आणि खड्डे यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप करत नागरिक रस्त्यावर उतरले. त्यानंतर काही काळ त्यांनी रस्ता रोखून धरला.

पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळ पहाटे साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. हे पती-पत्नी शिरूर कासार येथून नगरकडे निघाले होते. मात्र महामार्गावरील खड्डे चुकवताना बाईक एसटी महामंडळाच्या नगरहून -पाथर्डीकडे जाणाऱ्या बस खाली आणि त्या दोघांचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आहे.

घटनास्थळी पोलीस उशिराने आल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते. हा अपघातात झाला आहे, खड्ड्यांमुळे पती-पत्नीला जीव गमवावा लागला, असा आरोप गावकऱ्यांनी केला. तसेच आक्रमक भूमिका घेत रस्तारोको देखील सुरू ठेवला.

nagar-pathardi-rastaroko