जिवाची बाजी लावणाऱ्या पोलिसाचा महापौरांकडून सत्कार

फोटो - सचिन लाडे

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील मोजो टेरेस पबला लागलेल्या आगीमध्ये शौर्य दाखवलेले पोलीस शिपाई सुदर्शन शिंदे यांचा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सत्कार केला आहे. आगीमध्ये शौर्य दाखवणाऱ्या शिंदे यांना मुंबई पोलिसांमधील सिंघम म्हणून संबोधले जात आहे.

नववर्ष सुरू होण्याच्या काही दिवसांआधी मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील मोजो टेरेस पबला आग लागून मोठी दुर्घटना झाली होती. यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. मोजो टेरेस पबला आग लागल्यानंतर पोलीस शिपाई सुदर्शन शिंदे सर्वात आधी त्याठिकाणी पोहोचले होते. त्यानंतर शिंदे यांनी जिवाची बाजी लावत सातव्या मजल्यावरून स्ट्रेचरची वाट न पाहता तीन मृतदेहांना खांद्यावर टाकून खाली आणले होते. यावेळी एका पत्रकाराने काढलेला त्यांचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

sudarshan