कमालिस्तान स्टुडिओ होणार जमीनदोस्त; उभे राहणार कॉर्पोरेट ऑफिस पार्क 

61

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलीवूडच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असलेल्या आर.के. स्टुडिओपाठोपाठ आता सहा दशके जुना असलेला अंधेरीतील कमाल अमरोही म्हणजेच कमालिस्तान हा स्टुडिओदेखील जमीनदोस्त होणार आहे. या जागी आता देशातील सर्वात मोठे कॉर्पोरेट ऑफीस पार्क तयार केले जाणार आहे. बॉलीवूडच्या अनेक सिनेमांचा साक्षीदार असलेला हा स्टुडिओ येत्या काही दिवसांत नाहीसा होणार असल्याने सिने वर्तुळात नाराजी आहे.

कमालिस्तान स्टुडिओ हा 15 एकर जागेवर वसला आहे. डी.बी. रियल्टी आणि बंगळुरूस्थित आरएमझेड कॉर्पोरेशन यांनी या जागेची खरेदी केल्याचे वृत्त आहे. हा स्टुडिओ जमीनदोस्त करून येथे कॉर्पोरेट ऑफीस पार्क उभारले जाणार असून त्याचे नाव एस्पायर असणार आहे. या प्रकल्पाची किंमत 21 हजार कोटी असल्याचे समजतेय.  कमालिस्तान स्टुडिओची स्थापना कमाल अमरोही यांनी 1958 साली केली होती. या स्टुडिओत महल, पाकिझा, रझिया सुलतान, अमर अकबर एंथोनी, कालिया यासारख्या अनेक सिनेमांचे चित्रीकरण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या