मोजो टेरेस दुर्घटनेतील १४ जणांचा मृत्यू हा धुराने गुदमरल्याने

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईतील अत्यंत पॉश अशा कमला मिल कंपाऊंडमधील मोजो टेरेस या पबला रात्री साडेबारा वाजता आग लागून १५ जणांचा मृत्यू झाला. यातील १४ जणांचा मृत्यू हा धुराने गुदमरल्याने झाल्याचं शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झालं आहे.


यातील बहुतांश महिला असल्याचंही दिसून आलं आहे. प्राथमिक अंदाज हा आहे की जेव्हा आग लागली तेव्हा आगीपासून संरक्षण मिळवण्यासाठी या महिला बाथरूममध्ये आसरा घेण्यासाठी गेल्या, मात्र आग इतकी भडकली की त्या बाहेर पडू शकल्या नाहीत किंवा त्यांना वाचवण्यासाठी कोणी आतही जाऊ शकलं नाही. यामुळे तिथेच अडकून पडल्याने या महिलांचा गुदमरून मृत्यू झाला असावा.

या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील दु:ख व्यक्त केलं आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहतानाच जखमी लवकरात लवकर बरे होवोत अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.


दरम्यान या आगीमुळे त्याच परिसरात असलेल्या अनेक वाहिन्यांच्या कार्यालयांनाही झळ बसली आहे. यामध्ये मराठी वृत्तवाहिनी टीव्ही ९, इंग्रजी वृत्त वाहिनीच्या कार्यालयांचा समावेश आहे. टीव्ही ९ च्या तांत्रिक प्रसारण सेवेलाही या आगीचा फटका बसला, ज्यामुळे त्यांना एका छोट्या खोलीमध्ये थेट प्रसारणासाठीचा संच उभा करावा लागला. या संचाच्या आधारे त्यांनी थेट प्रक्षेपण सुरू ठेवले आहे.

  • mahendrapadalkar

    आता टेरेस हाँटेल ची कल्पना राबवणार्या आदित्य ठाकरे यांना जबाबदार धरून रोज चिखलफेक करणार का ?

    जशी मोदींवर रोज करता खुसपट काढुन.
    सुधर जाव, संजय.