कमलाकर तपस्वी

4

ज्येष्ठ भजन गायक आणि संगीतकार ही तर कमलाकर तपस्वी यांची ओळख होतीच, पण त्याहीपेक्षा ते खऱ्या अर्थाने संगीत साधक होते. केवळ संगीत साधनेत खंड पडू नये यासाठी त्यांनी सरकारी नोकरीवर तुळशीपत्र ठेवले होते आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीत ते रुजू झाले होते. शिष्यपरिवारामध्ये तपस्वी ‘काका’ या नावाने ते परिचित होते. शनिवारी भजनाच्या कार्यक्रमात गायन सुरू असतानाच तपस्वी यांना हृदयकिकाराचा झटका आला. त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. ‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय’ या गजराने हजारो लोकांना अध्यात्माची गोडी लावणारे व्यक्तिमत्व म्हणून तपस्वीकाका परिचित होते. लहान वयापासून कीर्तनाचा छंद असलेल्या तपस्वी यांनी समर्थ संगीत विद्यालयाच्या हरिभाऊ गाके यांच्याकडे शास्त्रीय आणि सुगम संगीताचे शिक्षण घेतले. पुणे किद्यापीठात संगीताचे शिक्षण घेत असताना ते सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले होते. स्वामी समर्थांकर गीतलेखन करणाऱ्या तपस्वी यांनी स्वामीगीते स्वरबद्ध केली आहेत. पार्श्वगायक आणि संगीतकार म्हणून सन्मान लाभलेल्या तपस्वी यांनी भजन गायनाचे साडेचार हजारांहून अधिक कार्यक्रम केले आहेत. तपस्वीकाकांनी सातशेहून अधिक गीतांचे लेखन तसेच श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, श्री चिले महाराज, श्री शंकर महाराज, श्री साईबाबा आणि श्री गणेशगिरी महाराज अशा सहा विभूतींच्या लीलामृत पोथ्यांचे लेखनही केले आहे. तपस्वीकाका स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते. अध्यात्माचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. थोर स्वामीभक्त, आकाशकाणीचे ग़ायक, स्वामीकाक्य़रचैते अशी त्यांची ओळख होती. ते दत्तभक्तांच्य़ा व स्वामीभक्तांच्य़ा मांद़ियाळीतील एक महान आध्य़ात्मिक विभूती होते. त्य़ांच्य़ा सान्निध्य़ात अनेक साधकांनी भक्तिमार्गाने मार्गक्रमण केले. अनेकांनी त्य़ांच्य़ा मार्गदर्शनानुसार स्वामीसाधना केली. प्रत्यक्ष स्वामींची कृपा लाभलेलं व्यक्तिमत्व, महान गायक, वाचासिद्धी प्राप्त झालेले, त्यांच्या घरी स्वामींचा वास जाणवायचा. गेल्या अनेक वर्षांपासून ते अध्यात्मावर निरूपण करीत होते. त्यांना गुरुमाहात्म्य पुरस्कार, मंगलभवन सेवा मंडळाचा सन्मानचिन्ह मानकरी पुरस्कार, नवोदय मानक विकास सेवा संस्थेचा भक्तिगंधर्व पुरस्कार, प्रज्ञाचक्षू पुरस्कार, संगीतरत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.