‘कंगनाच्या ट्विटरवरुन ऋतिकला हाय करेन’

सामना ऑनलाईन । मुंबई

कंगना रणौतचे ‘दिवा’ हे व्हिडीओ गाणे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. कंगना आणि वरुण ठाकूरवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. त्यामुळे या दोघांमध्ये सध्या चांगलीच मैत्री जुळली आहे.

एका सेटवर वरुणला कंगनाचे ट्विटर अकाऊंट तुला वापरण्यास मिळाले तर काय करशील असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर ‘मी ऋतिकला हाय असा मेसेज करेन’ असे वरुणने सांगितले.वरुण इतक्यावरच थांबला नाही तर कंगना-ऋतिकमधील ते वादग्रस्त ई-मेल हाती आले तर मी ते सर्व मेल डिलीट करेन. त्यामुळेच आपण या वादविवादाला मूठमाती देऊ शकू असे वक्तव्य वरुणने केले आहे.

कंगना आणि ऋतिकमधील वाद गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये चांगलाच गाजला होता. आता वरुणच्या या वक्तव्यामुळे कंगना आपल्या या नव्या ‘बेस्ट फ्रेंड’ पासून आपला फोन दूरच ठेवणार हे नक्की