करणी सेनेला कंगनाचे राजपुती बाण्यात उत्तर

1
मणिकर्णिका - द क्विन ऑफ झांसी

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलीवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी कंगना रनौतने करणी सेनेच्या इशाऱ्याला बेधडक उत्तर दिले आहे. मी कोणाला घाबरत नाही, मी ही राजपूत आहे. एकेकाला नष्ट करेन, असं उत्तर कंगनाने दिले आहे.

मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटाला करणी सेनेने विरोध दर्शवला असून आम्हाला चित्रपट दाखवला नाही तर आम्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. सिनेमागृहांची तोडफोड करू, असा इशारा देण्यात आला आहे. त्यावर प्रश्न विचारला असता कंगनाने आपली बाजू स्पष्ट मांडली. आम्ही चार इतिहासकारांना हा चित्रपट दाखवला आहे. सेन्सॉरने देखील त्याला सर्टिफिकेट दिले आहे. करणी सेनेला याची माहिती अगोदरच देण्यात आली आहे. असे असताना देखील त्यांचा विरोध असेल आणि त्यांनी काही केले तर मी देखील राजपूत आहे, असा प्रति इशारा तिने दिला आहे.