कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर पुन्हा एकत्र येणार

सामना ऑनलाईन । मुंबई

‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या कार्यक्रमातील कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या जबरदस्त कॉमेडी केमिस्ट्रीमुळे हा शो खूप हिट झाला होता. मात्र एका परदेश दौऱ्यावरून परतताना कपिलने दारुच्या नशेत सुनीलला मारहाण केली होती. या मारहाणीनंतर सुनीलने कॉमेडी नाईट्स विथ कपिलला रामराम ठोकला होता. सुनीलने हा शो सोडल्यामुळे कपिलच्या शोची लोकप्रियता कमी होत गेली होती व नंतर तो शो बंदही पडला. मात्र आता हे दोघेही मतभेद विसरुन पुन्हा एकत्र येणार आहेत. लवकरच हे दोघे एकत्र येऊन एक नवा कॉमेडी शो सुरू करणार आहेत.

कपिल शर्माने नुकतेच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. ‘मी आणि कपिल लवकरच एकमेकांना भेटणार असून पुढील कार्यक्रमाची चर्चा करणार आहोत. सध्या कपिल कॅनडात आहे. तो तेथून परत आला की आम्ही भेटू. आमच्या शो च्या इतर कलाकारांनाही आम्ही दोघे परत भेटणार आहोत. या मिटींगमध्ये आमच्या नव्या शोची चर्चा करणार आहेत’ असे कपिल शर्माने यावेळी सांगितले. सुनील व कपिलच्या वादानंतर सुगंधा मिश्रा, चंदन प्रभाकर, अली असगर यांनी देखील कपिलचा शो सोडला होता. आता सुनील सोबत ही मंडळी देखील परतणार आहेत.