बेरोजगार कपिलला रिक्षावाल्याने दिला नकार… पाहा मग काय घडलं

सामना ऑनलाईन । मुंबई

कपिल शर्माच्या नव्या शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. या शोच्या बाबत अधिक माहिती समोर आली नसून नव्या शोमध्ये नव्या अवतारात कपिल प्रेक्षकांच्या समोर येणार असल्याचं या प्रोमोमधून दिसत आहे. सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजन या चॅनलवर हा शो असणार आहे हे मात्र प्रोमोतून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून गायब असलेल्या कॉमेडी किंग  कपिल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या प्रोमोमध्येही कपिल एके ठिकाणी जाण्यासाठी रिक्षावाल्याला आवाज देत आहे. मात्र रिक्षावाला कपिल शर्माकडे सध्या काही काम नाही म्हणून येण्यास नकार देतो. तेवढ्यात कपिल शर्माला एक फोन येतो आणि तो फोन सोनी चॅनलचा असतो. मग कपिल रिक्षावाल्याला सोडून बसने त्याच्या वाटेला निघून जातो, मात्र जाताना त्याच्या कॉमेडी स्टाईलमध्ये एक डायलॉग मारून जातो. काय आहे तो डायलॉग हे तुम्हाला प्रोमो पाहिल्यावरच कळेल.

कपिल शर्मा ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कपिल टेलिव्हिजन पासून दूर होता मात्र लवकरत तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.