करिनाच्या जॅकेटची किंमत ऐकलीत का?

सामना ऑनलाईन । मुंबई

करिना कपूर ही कायम तिच्या ट्रेण्डी लूकसाठी चर्चेत असते. बेबोचा प्रेग्नेन्सीमधला लूक असो किंवा तिचा पार्टी, एअरपोर्ट लूक असो चर्चा तर होणारच.

‘वीरे दि वेडिग’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी थायलंडला जाताना करिनाने घातलेल्या डेनिम जॅकेटची किंमतीवर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या जॅकेटच्या किमतीत एका सर्वसामान्य व्यक्तीच्या घरातील वर्षभराचे किराणा सामान भरले जाऊ शकते.

बेबोच्या या डेनिम जॅकेटची किंमत तब्बल ८४ हजार रुपये आहे. मध्यम निळ्या रंगाचे हे जॅकेट ‘बॅलेनसिएगा’ या इंटरनॅशनल ब्रॅण्डचे असून जगभरातील अब्जोपतींमध्ये एक प्रसिद्ध ब्रॅण्ड आहे. करिनाने ब्लॅक जीन्सवर हे ‘बॅलेनसिएगा’चे पुढून बटन असलेले जॅकेट घातले आहे. या जॅकेटसोबत तिने काळ्या रंगाची बॅग व सोनेरी घड्याळ घालून बेसिक लूक ठेवला आहे.

बेबो लवकरच वीरे दि वेडींग या चित्रपटातून कमबॅक करणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरील तिच्या फर्स्ट लूकमध्येही करिना आणि सोनम कपूर हटके दिसत आहे. यात त्या दोघीनी शेरवानी घालून पगडी बांधली आहे.