करिना कपूर आगामी चित्रपटासाठी घेणार ६ कोटी मानधन?

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडचे सिनेमे आणि बॉलिवूड कलाकारांचं जनसामान्यांना नेहमीच आकर्षण असते. तसेच या कलाकारांना मानधन किती मिळतं याबाबत पण नेहमीच उत्सुकता असते. आता करिना कपूरला तिच्या आगामी चित्रपटासाठी तब्बल ६ कोटी रुपये मिळणार असल्याची चर्चा आहे. आई झाल्यानंतर करिनाचा हा पहिलाचा सिनेमा असणार आहे, त्यामुळे तिच्यासाठी हा डबल धमाका आहे.

करिना कपूर तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमातून पुनरागमन करणार आहे. त्यासाठी ती प्रचंड मेहनतही करत आहे. खास करून ती आपल्या लूककडे प्रामुख्याने लक्ष देत आहे, आणि पूर्वीसारखं स्लीम आणि फीट होण्यासाठी ती मेहनत करत आहे. विशेष बाब म्हणजे या सिनेमासाठी करिनाला ६ कोटी रुपये मानधन मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये तिचं पुनरागमन तिच्यासाठी खास आहे. गेल्याच वर्षी ती आई बनली होती. एकंदर लग्नानंतर अभिनेत्रींचं बॉलिवूडमधलं करिअर जवळपास संपतं, मात्र हा समज खोडण्यासाठी करिना आता सज्ज झाली आहे असं म्हणावं लागेल.