कर्नाटक LIVE : राज्यपालांकडून घोडेबाजाराला प्रोत्साहन – कुमारस्वामी

सामना ऑनलाईन, बंगळुरू

 • भाजपला १५ दिवसांची मुदत देणे म्हणजे घोडेबाजाराला प्रोत्साहन देणे – कुमारस्वामी

 

 • गोव्यातील निर्णायचे राज्यपालांनी अनुकरण करावे
 • राज्यपालांनी सुप्रीम कोर्टाचा मान राखावा – सिब्बल
 • मोदी सरकारने राज्यघटनेचा अपमान केलाय – काँग्रेस
 • काँग्रेसची पत्रकार परिषद सुरु
 • आमच्याकडे ११७ आमदारांचे समर्थन, आम्हाला निमंत्रण हवे – कुमारस्वामी
 • आम्ही कायदेतज्ज्ञांकडून अधिक माहिती घेऊ – कुमारस्वामी

 

 • काँग्रेस-जेडीएस नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
 • जेडीएस कार्यकर्त्यांचे राजभवानाबहेर आंदोलन

 • राजभवनाबाहेर अभूतपूर्व परिस्थिती
 • राज्यपालांसमोर सर्व आमदारांची परेड करण्यास तयार
 • सर्व ३८ आमदार सोबत असल्याचा जेडीएसचा दावा
 • जेडीएस आणि काँग्रेसचे आमदार राजभवनमध्ये दाखल

 

 • काँग्रेस -जेडीएसचे नेते राज्यपालांना भेटणार
 • कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग
 • राजभवनाबाहेर उद्या आमदार उपोषणाला बसणार, खासदारही उपोषणात सहभागी होणार
 • काँग्रेस-जेडीएसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण न दिल्यास आमदार उपोषणाला बसणार
 • १२.३० वाजल्यापासून आम्ही राज्यपालांची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय-गुलाम नबी आझाद
 • राज्यपालांनी काँग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांना भेटीसाठी ताटकळत ठेवले
 • जेडीएसबरोबर युती करण्याच्या निर्णयावर काँग्रेस आमदार खूश नाहीत-प्रकाश जावडेकर
 • एका आमदाराला शंभर कोटींची ऑफर दिल्याचं वृत्त धादांत खोटं आहे- प्रकाश जावडेकर

 • धर्मनिरपेक्ष सरकार कर्नाटकात यावं हा आमचा प्रयत्न आहे-डी.शिवकुमार
 • आम्हाला जेडीएसला पाठींबा देण्याच्या बदल्यात काहीही नकोय- डी.शिवकुमार, काँग्रेस
 • कुमारस्वामी यांना समर्थन दाखवणाऱ्या आमदारांच्या सह्या घेण्याची प्रक्रिया सुरू
 • उर्वरीत चार आमदार आपल्या संपर्कात असल्याचा काँग्रेसचा दावा
 • काँग्रेसच्या बैठकीला ७८ पैकी ४ आमदार गैरहजर
 • काँग्रेसच्या नवनिर्माचित आमदारांची बैठक संपली
 • प्रकाश जावडेकर आणि माझी भेट झाल्याचे वृत्त बोगस आहे-कुमारस्वामी
 • भाजपचा अश्वमेध कर्नाटकने रोखला आहे-कुमारस्वामी
 • जर तुम्ही आमचा एक आमदार फोडला तर आम्ही तुमचे दोन आमदार फोडू-कुमारस्वामी
 • अपक्षाच्या पाठींब्यामुळे भाजपचे संख्याबळ १०५ झाले
 • एका अपक्षाचा भाजपला पाठींबा
 • भाजपमुळे माझ्या वडीलांच्या राजकीय कारकिर्द डागाळली होती, हे डाग धुवून काढण्यासाठीच मी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला-कुमारस्वामी
 • मला भाजपनेही ऑफर दिली होती-कुमारस्वामी
 • आयकर विभागाचे अधिकारी आता कुठे गेले ? – कुमारस्वामी
 • प्रत्येक आमदाराला १०० कोटी रूपये देण्यासाठी भाजपकडून पैसे कुठून आले – कुमारस्वामी

 • भाजपने जेडीएसच्या प्रत्येक आमदाराला १०० कोटी देण्याची ऑफर दिली होती-कुमारस्वामी
 • भाजपने दुही माजवून मते मिळवली,
 • काँग्रेसने पाठींबा दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे- कुमारस्वामी
 • प्रकाश जावडेकर आणि कुमारस्वामी यांच्यात खलबतं झाल्याची चर्चा
 • भाजपची जेडीएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची चर्चा
 • आम्ही सत्तास्थापनेचा दावा केला आहे, लवकरात लवकर निर्णय घेण्याची येडियुरप्पा यांची विनंती
 • येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेतली
 • कर्नाटक LIVE- १२ आमदार ‘नॉट रिचेबल’, काँग्रेससमोर संकट
 • काँग्रेसच्या बैठकीत ७८ पैकी ६६ आमदार आहोत, १२ आमदारांची बैठकीत गैरहजेरी
 • काँग्रेसची बंगळुरूत बैठक सुरू
 • जेडीएस आणि काँग्रेस सहा महिन्यांपूर्वी एकमेकांशी झगडत होते, आता फक्त सत्तेसाठी एकत्र येत आहेत- सदानंद देवेगौडा
 • कर्नाटकात आम्ही मोठा पक्ष ठरलो आहोत, जनतेला भाजप हवी आहे. जनता आमच्या सोबत आहे, योग्य पावलं उचलू- प्रकाश जावडेकर
 • जेडीएसचे आमदार म्हणाले गायब झालो नाही, बंगळुरूत बैठकीसाठी निघालो
 •  भाजपचे ६ आमदार आमच्या संपर्कात आहेत, काँग्रेसच्या एमबी पाटील यांचा दावा

mb-patil-new

 • भाजप घाणेरडे राजकारण करत आहे, आमच्याकडे ११८ आमदार आहेत, आम्हाला त्यांच्या इतकं खाली पडायचं नाही- एनए हॅरिस (काँग्रेस)
 • दोन्ही आमदार भाजपने पळवल्याची चर्चा
 • राजा वेकटप्पा नायक, वेंकट नाडगौडा हे आमदार गायब आहेत
 • बैठकीला दोन आमदार आले नाहीत
 • जेडीएसची बंगळुरूतील एका हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे
 • जनता दल सेक्युलरचे दोन आमदार गायब