नालासोपाऱयात घरासाठी ‘गृहलक्ष्मी’चा काटा काढला

80
file photo

सामना प्रतिनिधी। कसई

नालासोपारा येथील हनुमाननगर भागात एका महिलेच्या हत्याकांडाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नी राहत असलेले घर बळकावण्यासाठी पतीने आणि सावत्र मुलाने या महिलेची हत्या केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी या दोघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत.

हनुमाननगर परिसरातील एका निर्जनस्थळी 21 जानेवारी रोजी कुसूम प्रजापती यांचा मृतदेह सापडला होता. प्राथमिक तपासात तीक्ष्ण हत्याराने वार करून कुसूम यांची हत्या केल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. कुसूम यांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या एका मोबाईल नंबरनुसार पोलिसांनी थेट कोपरखैरणे येथे धाव घेतली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही, परंतु त्याच परिसरात एका तरुणाने कुसूम यांना ओळखले आणि तपासाचे चक्र वेगाने फिरले. पोलिसांनी त्यांचा पती आणि सावत्र मुलगा आणि त्यांना मदत करणारा त्यांचा भाचा यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.

कुसूम यांच्या पतीने दुसरे लग्न केले होते. ज्या घरात कुसूम राहत होत्या ते घर त्यांच्या पतीला पाहिजे होते. मात्र ते देण्यास नकार दिल्यामुळे या तिघांनी कुसूम यांचा काटा काढला, अशी माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस के. डी. कोल्हे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या