कठुआ प्रकरण : पीडित कुटुंबीय आणि वकिलांना सुरक्षा द्या- सर्वोच्च न्यायालय

supreme_court_295

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कठुआ गँगरेप प्रकरणातील पीडित कुटुंबीय आणि त्यांचे वकील यांना सुरक्षा पुरविण्याची आदेश सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-कश्मीर सरकारला दिले आहेत. पीडित मुलीच्या वडिलांनी सुरक्षा मिळणेबाबत आणि प्रकरण जम्मू-कश्मीरबाहेर वर्ग करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रकरण जम्मू कश्मीरबाहेर पाठवण्याबाबत येत्या २७ एप्रिल सुनवणी होणार आहे. प्रकरणाची सुनावणी चंदिगडमध्ये व्हावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे वकील दीपिका सिंह राजावत यांनी म्हटल की, या प्रकरणीचाी सुवावणी कठुआ येथील न्यायलयात झाल्यास त्यांच्या जीवाला धोका आहे, तसेच कठुआमध्ये पीडितेला न्याय मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणावर लक्ष ठेवावी अशी मागणी वकिलांनी केली. तसेच पोलिसांच्या चौकशीवर आमचा विश्वास असून आम्हाला सीबीआय चौकशी नकोय, असही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण?

कठुआ जिल्ह्य़ातील रासना गावातील आठ वर्षांची आसिफा १० जानेवारीला मेंढ्या, खेचर चारण्यासाठी घरापासून जवळ जंगलात गेली आणि तेथून ती बेपत्ता झाली. दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने आसिफाचे वडील महंमद युसुफ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. १७ जानेवारीला गावाच्या जवळच्या जंगलात तिचा मृतदेह सापडला. तिच्या शरीरावर जखमा होत्या. शवविच्छेदनात आसिफावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. २३ जानेवारीला गुन्हे शाखेकडे तपास हस्तांतरीत केला. एसआयटीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मुख्य आरोपी सांजीराम पोलिसांना शरण आला. याप्रकरणी सांजीरामचा मुलगा, पुतण्या यांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच दोन पोलीस अधिकाऱ्यांनाही अटक केली. आरोपींविरोधात ९ एप्रिलला एसआयटीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं.