कॅनडात कतरिनाबरोबर सेल्फीसाठी धक्काबुक्की

सामना ऑनलाईन। ओटावा

सध्या कॅनडात असलेल्या बार्बी डॉल कतरिना कैफ हिच्याबरोबर धक्काबुक्की करण्यात आली आहे. कतरिनाबरोबर सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. यावेळी काहीजणांनी तिला धक्काबुक्की केली. यामुळे चिडलेल्या कतरिनाने काही चाहत्यांना सुनावलेही. यावर काहीजणांनी तिला आम्ही तुझ्यासाठी नाही तर सलमान खानसाठी इथे आलो असल्याचं सांगत तिची खिल्ली उडवली.

कतरिना सध्या सलमानच्या दबंग ३ चित्रपटाच्या टूरवर आहे. ती वेगवेगळ्या देशात फिरत आहे. याचनिमित्ताने ती कॅनडातील वैंकूवर शहरात गेली आहे. तिथे तिचा परफॉर्मन्स होता. शो संपल्यानंतर ती परतत असताना काही चाहत्यांनी सेल्फी काढण्यासाठी तिला आग्रह केला. तर काहीजणांनी तिची वाट अडवली. यामुळे कतरिना वैतागली व तिने मला तुमच्याबरोबर सेल्फी काढायचा नाही. असे ठणकावून सांगितले. हे ऐकून काहीजणांनी तिला धक्काबुक्की केली. ते तिला घमेंडी असल्याचे बोलू लागले. तर काहीजणांनी तूझ्यासाठी नाही तर सलमानसाठी आम्ही आलोय असे तिला चिडवून सांगितले. त्यानंतर मात्र कतरिना शांत झाली व कारमध्ये बसण्याआधी तिने काहीजणांबरोबर सेल्फी काढला.