वर्ल्ड कपमध्ये मिळालेली सर्व कमाई सेवाभावी संस्थेला दान करणार एमबापे

38

सामना ऑनलाईन | मॉस्को

यंदाच्या २१ व्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत बक्षिसाच्या रूपात मिळालेली सर्व रक्कम दिव्यांग क्रीडापटूंच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या प्रेयर्स डी कोर्डीस या सेवाभावी संस्थेला दान करण्याचा निर्णय फ्रान्सचा युवा फुटबॉलस्टार किलियन एमबापे याने घेतला आहे.

यंदाच्या फिफा विश्वचषकात सर्वोत्तम युवा फुटबॉलपटू म्हणून सन्मानित करण्यात आलेल्या एमबापेला विश्वचषकात १७ हजार पौंड्स ( सुमारे १५ लाख १३ हजार रुपये) इतकी रक्कम बक्षिसादाखल मिळाली आहे. ती त्याने दान करण्याची घोषणा केली आहे.  देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मानधन अथवा बक्षीस घेणे योग्य वाटत नाही. म्हणून मी मला मिळालेली रक्कम विकलांग क्रीडापटूंच्या विकासासाठी द्यायचे ठरवले आहे असे एमबापे म्हणाला. गेल्या हंगामात एमबापे मोनॅकोच्या पॅरिस सेंट जर्मन क्लबचा खेळाडू होता आणि फुटबॉल इतिहासातील सर्वात महागडा युवा फुटबॉलपटू म्हणून त्याच्या नावाची नोंद झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या