ड्रेनेज, नालेसफाई होणार टेन्शन फ्री

19
kdmc

सामना प्रतिनिधी । डोंबिवली

सफाईनाल्यांची असो की, ड्रेनेजेची. या कामांमध्ये बाल कामगारांनाच जुंपण्यात येते. कंत्राटदार बिनधास्तपणे त्यांच्या जिवाशी खेळत असतात. ही मुले खोल गटारात किंवा नाल्यात उतरतात तेव्हा जीव गुदमरतो. आता डोंबिवलीत प्रथमच विषारी वायू शोधणारे यंत्र आणले असल्यामुळे ड्रेनेज व नालेसफाई टेन्श्न प्री होणार आहे. त्यामुळे प्राणहानीही टळेल.

गेल्या वर्षी डोंबिवलाच्या नाल्यातील व विहिरीतील विषारी वायूमुळे पाचजणांना आपले प्राण गमवावे लागले. यामुळे उद्योजकांना प्रखर टीकेला तोंड द्यावे लागले. हे लक्षात घेऊन ‘कामा’ संघटनेने आपल्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त जर्मन तंत्रज्ञानावर आधारलेले विषारी वायू मोजणारे मशीन प्रथमच डोंबिवलीत आणले आहे. डोंबिवलीतील नाल्यातून अनेक कंपन्या विषारी वायू नाल्यात सोडतात. यामुळे सतत वायू प्रदूषण होत असल्याने नागरिकांना त्रासाला तोड द्यावे लागते.

कामगार नाल्यात उतरण्यापूर्वी यामध्ये कोणते विषारी वायू आहेत ते या मशीनमुळे ओळखता येणार आहेत. मशीन नाल्यात सोडल्यानंतर मॉनिटरवर नाल्यात कोणत्या प्रकारचा विषारी वायू आहे हे लाल, भगव्या, हिरव्या सिग्नलमार्फत समजेल. या मशीनवर कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, मिथेन या दहा प्रकारच्या विषारी वायूंची नोंद होणार आहे.

नाममात्र भाडे

कामा संघटनेने आपल्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त डोंबिवलीकरांना ही भेट दिली असून सांडपाणी प्रक्रिया केंद्रात मशीन ठेवण्यात येणार आहे. नाममात्र दरात हे मशीन सर्वांना भाडय़ाने उपलब्ध होणार असल्याचे अध्यक्ष देवेन सोनी व श्रीकांत जोशी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या