मराठमोळा केदार जाधव पूर्ण फिट, पंतची वर्ल्ड कपला जाण्याची आशा मावळली

85

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अष्टपैलू केदार जाधव आता खांद्याच्या दुखापतीतून पूर्ण सावरला असून बुधवारी आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी जाणाऱया टीम इंडियात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआय राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केले आहे. त्यामुळे आता यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची वर्ल्ड कपला जाण्याची उरलीसुरली आशाही संपुष्ठात आली आहे.

आयसीसी विश्वचषकासाठी 15 सदस्यीय टीम इंडिया आज मंगळवारी मध्यरात्री सपोर्ट स्टाफसोबत लंडनला प्रयाण करणार आहे.हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) विश्वचषक स्पर्धेसाठी जाणाऱया 15 सदस्यीय हिंदुस्थानी क्रिकेट संघाला अंतिम मंजुरी दिली आहे.

केदार आयपीएलदरम्यान झाला होता दुखापतग्रस्त
मराठमोळा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता.त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती.पण स्वतः केदार आणि टीम इंडियाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी या दुखापतीला पळवून लावले.केदार आता पूर्ण फिट झाल्याचे प्रमाणपत्र फरहार्ट यांनी दिले.

आयसीसी विश्वचषक 2019 साठी टीम इंडिया
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी ( यष्टीरक्षक ), केदार जाधव, शिखर धवन, विजय शंकर, हार्दिक पांडया, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह

आपली प्रतिक्रिया द्या