खिमा पॅटीस

साहित्य : अर्धा किलो खिमा, दोन चमचे आले-लसूण पेस्ट, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, अर्धा किलो बटाटे, दोन कांदे, लिंबू, कोथिंबीर, एक-दोन अंडी, बटरचा चुरा, तेल.

कृती : खिमा पॅटीस बनवताना सर्वप्रथम तेलात चिरलेला कांदा घालून त्यावर आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. नंतर पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, एक चमचा गरम मसाला व मीठ घालून नंतर त्यात लिंबू पिळून कोथिंबीर घालून एकत्र करा. लिंबाएवढा बटाटय़ाचा गोळा घेऊन त्याची वाटी करा. वाटीत खिमा भरून वाटी बंद करायची. नंतर फेसलेल्या अंडय़ात पॅटीस बुडवून बटरच्या चुऱ्यात ठेवून सगळीकडून चुरा लावा. सुरीने बाजू हळूहळू दाबून पॅटीसच्या वरच्या व खालच्या बाजूने चपटा व गोल कराय तेलात गुलाबी रंग होईपर्यंत तळून टॉमॅटो सॉसबरोबर खायला द्या.