वाढवण्यात खंडोबाची स्वंयभू मूर्ती प्रकट

सामना प्रतिनिधी । वाढवणा

येथील जुना निजाम कालीन वाढवणा ते एकुरका गावाकडे जाणाऱ्या खंडऱ्याच्या पायरी रस्त्यालगत खंडोबाची स्वंयभू मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती पाषाणाची आहे. मूर्तीला चांदीचे डोळे आहेत. दीड फुटाची खंडोबाची मूर्ती प्रकट झाल्याने बघण्यासाठी असंख्य भक्ताची गर्दी होताना दिसत आहे.

श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मूर्ती प्रकट झाल्याची माहिती शिंदे सुभाष यांनी दिली. तिथे शेळ्या चारणारी एक महिला होती. तिला ही मूर्ती आढळली. एका काटेरी झुडुपाखाली स्वंयभू मूर्ती प्रकट झाल्याचे दिसले. ती बातमी वाऱ्यासारखी पसरली. या रस्त्यावरून दररोज शेकडो पादचारी शेताकडे दररोज जात असतात मात्र या ठिकाणी कधीच अशी मूर्ती दिसली नव्हती. मूर्ती प्रकट झाल्याचे कळताच बघण्यासाठी गर्दी होत असून श्रीफळ हार खंडोबा मूर्तीला अर्पण करण्यात येत आहे. गावात मुर्तीचीच चर्चा केली जात आहे.