सरदार, देवेंद्र झाझरिया‘खेलरत्न’, चेतेश्वर पुजारा, हरमनप्रीतसह १७ जणांना ‘अर्जुन’ पुरस्कार

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणारा माजी हिंदुस्थानी हॉकी कर्णधार सरदार सिंग आणि रियो पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकीचे सुवर्णपदक पटकावणारा दिव्यांग ऍथलीट देवेंद्र झाझरिया यांचा येत्या २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत क्रीडा क्षेत्रातील ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान होणार आहे. क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा, महिला क्रिकेटर हरमतप्रीत कौर यांच्यासह १७ जणांना ‘अर्जुन’ पुरस्काराने, ७ जणांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार तर तिघा क्रीडापटूंना ‘ध्यानचंद पुरस्कार’ही राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणार आहे.

केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी आज ‘राजीव गांधी खेलरत्न’, ‘अर्जुन’, ‘द्रोणाचार्य’ व ‘ध्यानचंद’ पुरस्कारासाठी खेळाडूंची नावे घोषित केली. ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराच्या यादीतून प्रशिक्षक सत्यनारायण यांचे नाव वगळण्यात आले आहे. तीन क्रीडापटूंना ‘ध्यानचंद जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ‘खेलरत्न’प्राप्त क्रीडापटूंना ७.५ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्राने गौरविण्यात येईल तर ‘अर्जुन’, ‘द्रोणाचार्य’प्राप्त क्रीडापटू व प्रशिक्षकांना पाच-पाच लाखांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

पुरस्कारप्राप्त क्रीडापटू

‘राजीव गांधी खेलरत्न’

 •  देवेंद्र झाझरिया पॅरा ऍथलीट (भालाफेक)
 • सरदार सिंग (हॉकी)

द्रोणाचार्य पुरस्कार

 • दिवंगत डॉ. आर. गांधी (ऍथलेटिक्स).
 • हिरानंद कटारिया (कबड्डी)
 • जीएसएसव्ही प्रसाद (बॅडमिंटन, जीवनगौरव).
 • ब्रिजभूषण मोहंती (मुष्टियुद्ध, जीवनगौरव).
 • पी. ए. रफेल (हॉकी, जीवनगौरव)
 • सन्जॉय चक्रवर्ती (कुस्ती, जीवनगौरव).

अर्जुन पुरस्कार

 • व्ही. जे. सुरेखा (तिरंदाजी),
 • खुशवीर कौर (ऍथलेटिक्स),
 • अरोकीया राजीव (ऍथलेटिक्स),
 • प्रशांती सिंग (बास्केटबॉल),
 • सुभेदार देवेंद्रो सिंग (मुष्टियुद्ध),
 •  चेतेश्वर पुजारा (क्रिकेट),
 • हरमनप्रीत कौर (क्रिकेट),
 • ओयनस बेम्बेम देवी (फुटबॉल),
 •  एस. एस. पी. चौरसिया (गोल्फ),
 • एस. व्ही. सुनील (हॉकी),
 • जसवीर सिंग (कबड्डी),
 • पी. एन. प्रकाश (नेमबाजी),
 • ए. अमलराज (टेबल टेनिस),
 • साकेत मायनेन (टेनिस),
 • सत्यवर्न कडीयन (कुस्ती),
 • मरियापण (पॅरा ऍथलीट) आणि ल
 • वरुणसिंग भाटी (पॅरा ऍथलीट).

ध्यानचंद पुरस्कार

 • भूपेंद्र सिंग (ऍथलेटिक्स),
 • सय्यद शाहीद हकीम (फुटबॉल),
 • सुमाराई टेटे (हॉकी, महिला).