‘ब्रँडिंग’ची खिचडी पकलीच नाही!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानीत आजपासून सुरू होणाऱया विश्व खाद्य भारत महोत्सवात ‘खिचडी’चे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग होणार… ती ‘नॅशनल डीश’ होणार… ८०० किलोची खिचडी गिनीज बुकात नोंदली जाणार अशा बातम्या बुधवारी देशभर झळकल्या. पण ‘ब्रँडिंग’ची खिचडी काही पकलीच नाही. खिचडी ही नॅशनल डीश होऊ शकत नाही, असे केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी आज स्पष्ट केले.

विश्व खाद्य भारत महोत्सवातला खिचडीचा प्रवेश हा केवळ एक पदार्थ म्हणूनच आहे, असे त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले. त्या खाद्य महोत्सवात शनिवारी शेफ संजीव कपूर हे 800 किलोची खिचडी बनवणार असून ती विदेशी पाहुण्यांना आणि गरीबांना वाटली जाणार आहे. त्यामुळे खिचडी भलताच भाव खावून गेली होती.