पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किम जोंग यांची धडपड

सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन

सातत्याने अणवस्त्र चाचणी केल्यामुळे उत्तर कोरियाच्या हुकुमशाह किम जोंग यांचा खिसा रिकामा झाला आहे. यामुळे जोंग अस्वस्थ झाले असून पर्यटना मधून परकिय चलन देशात आणण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्याने समुद्रकिनाऱ्यालगतच्या जुन्या इमारती पाडून तिथे गगनचुंबी इमारती, पंचतारांकित हॉटेल्स व मत्स्यालय उभारण्याचा सपाटाच लावला आहे.

kim-jong-tourist

यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी स्पेनला एक टीमही पाठवली होती. या टीमने स्पेनमधील पर्यटनस्थळांची पाहणी केली व तेथील अधिकाऱ्यांकडून त्याबद्दलची आवश्यक ती माहितीही मिळवली. ही टीम जगभरातील इतर लोकप्रिय पर्यटनस्थळांचीही पाहणी करणार आहे. त्यानंतर उत्तर कोरियात यासर्व पर्यटनस्थळांपेक्षा अधिक आकर्षक पर्यटनस्थळ उभारण्याची जोंग यांची योजना आहे. पर्यटनामधून जास्तीत जास्त परकीय चलन मिळवणे हा या मागचा जोंग यांचा हेतू आहे. वर्षाला १० लाख ते एक कोटी पर्यटक उत्तर कोरियात आलेच पाहिजेत असा जोंग यांचा आग्रह आहे.

north-korea

सध्या उत्तर कोरियाला पर्यटनातून वर्षाला ४.४ कोटी डॉलर उत्पन्न मिळते. त्यातही येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये चीनी पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे.