ट्रम्प यांना भेटायला किम-जोंग-उन त्यांचं शौचालय सोबत का घेऊन गेले ?

104

सामना ऑनलाईन, सेंटोसा बेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्यात ऐतिहासक भेट झाली. वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार किम जोंग उन यांनी या भेटीसाठी त्यांच्या देशातून सिंगापूरला नेलेल्या गोष्टींमध्ये शौचालयाचाही समावेश होता. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या गोष्टींची गरज लागते त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सोबत नेल्या होत्या ज्यामध्ये त्यांची आलिशान गाडी आणि शौचालयाचाही समावेश आहे. हे शौचालय त्यांनी का नेलं याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किम यांना उत्तर कोरियातून दुसऱ्या देशात जाताना नेहमी ही भीती वाटते की त्यांची विष्ठा गोळा करून त्याची चाचणी करून त्यांना कोणता आजार आहे, त्यांना कोणता त्रास होऊ शकतो याच्यावर संशोधन केलं जाऊ शकतं. त्यामुळे ते स्वत:चं शौचालय सोबत घेऊन फिरतात. त्यांच्या आलिशान मर्सिडीझमध्येही एक शौचालय असल्याचं सांगण्यात येतं. उत्तर कोरियामध्ये फिरत असतानाही किम हे कधीही सार्वजनिक शौचालयांचा वापर करत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या