सर्जिकल स्ट्राईकच्या वक्तव्यावर भाजपच्या मंत्र्यांचे हार्दिक पटेल यांना उत्तर

64
hardik patel

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हवाई दलाच्या बेपत्ता झालेल्या एएन 32 या विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशातील जंगलात सापडल्यानंतर आता या मुद्द्यावरून राजकारण सुरू झाले आहे. विरोधी पक्ष याबाबत सरकारला सवाल विचारून आरोपांच्या फैरी झाडत आहेत. गुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी या घटनेचा संबंध चीनशी जोडत सरकारने चीनविरोधात सर्जिकल स्ट्राईक करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी प्रत्युत्तर देत हार्दिक यांनी संयम बाळगून जबाबदारीने वक्तव्ये करावीत, असा सल्ला दिला आहे.

‘चीन मुर्दाबाद आहे आणि मुर्दाबादच राहील, सरकारने चीनविरोधात धडक कारवाई करावी. या घटनेला चीन जबाबदार असून त्यांच्याविरोधात सर्जिकल स्ट्राईक करावे, या कारवाईसाठी आम्ही मोदी सरकारच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत’, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले होते. त्यावर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी पटेल यांना प्रत्युत्तर दिले आहे. आपण काँग्रेस पक्षातील जबाबदार नेते आहात. या विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशात सापडले आहेत. अरुणाचल प्रदेश कोठे आहे, आपल्याला माहिती आहे, काय? अरुणाचल प्रदेश हा हिंदुस्थानचा अविभाज्य घट आहे. आपल्याच देशात सापडलेल्या विमानाच्या अवशेषांचा, चीनशी संबंध काय असा सवालही त्यांनी केला. पटेल यांनी विमान दुर्घटना आणी चीनचा संबंध ल्यावल्याने रुजिजू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपण जबाबदार नेते असून संयमाने आणि जबाबदारीने व्यक्तवे करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

3 जूनपासून हिंदुस्थानी हवाई दलाचे विमान एएन 32 बेपत्ता झाले होते. आसामच्या जोरहाटहून उड्डाण केलेल्या या विमानाचा अर्ध्या तासातच संपर्क तुटला होता. त्यानंतर आता त्याचे अवशेष अरुणाचल प्रदेशच्या जंगलात सापडले आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये विमानाच्या सापडलेल्या अवशेषांची तपासणी हवाई दलाकडून करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या