किरीट पाटील यांची रायगड जिल्हा इंटक अध्यक्षपदी निवड

सामना प्रतिनिधी । चिरनेर

उरण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरीट पाटील यांची रायगड जिल्हा इंटक अध्यक्षपदी निवड झाली आहे.
इंटकचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र इंटकचे कार्याध्यक्ष महेंद्र घरत यांनी किरीट पाटील यांच्यावर इंटकच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देत आज त्यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी रायगड इंटकचे कार्याध्यक्ष रामण, मिलिंद पाडगांवकर, सरचिटणीस वैभव पाटील, गुफरान तुंगेकर, जे. डी. पाटील, आनंद ठाकूर, उरण तालुकाध्यक्ष संजय ठाकूर, जयवंत पाटील (मामा) आदी उपस्थित होते.

उरण शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरीट पाटील यांची इंटकच्या जिल्हाध्यक्षपदी निवड होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गेली २८ वर्षे मी कंपनीत इंटकच्या माध्यमातून काम करीत आहे. त्यानंतर गेली १० वर्षांपासून इंटकचे महेंद्र घरत यांच्या बरोबरीने काम करीत आहे. आता माझ्यावर इंटकच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्या पदाला न्याय देत जिल्ह्यात इंटकच्या माध्यमातून कामगारावरील अन्यायाला वाचा फोडून त्या मार्गी लावू असा विश्वास किरीट पाटील यांनी व्यक्त केला. यामुळे काँग्रेस पक्षाचीही ताकद वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.