महाशिवरात्रीच्या निमित्ताने होणार ‘गजर कीर्तनाचा’

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण म्हणजे ‘महाशिवरात्री’ आणि याचंच औचित्य साधून छोट्या पडद्यावरच्या प्रेक्षकांसाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. १२ – १८ फेब्रुवारी या सप्ताहात प्रेम या विषयावर ह. भ. प. माधव महाराज रसाळ यांनी भक्तजनांसाठी प्रेम या विषयावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पिंपळे-सौदागर, पुणे येथे कीर्तनाचे आयोजन करण्यात आलं आहे.

या कार्यक्रमाचं प्रसारण महाशिवरात्रीच्या दिवशी होणार आहे. ‘गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा’ असं या कार्यक्रमाचं नाव असून हा खास कार्यक्रम महाशिवरात्रीच्या मंगलमय दिवशी झी टॉकीज या वाहिनीवर सकाळी ७:३० वा. प्रसारित होणार आहे.