‘बिग बॉस’च्‍या घरात किशोरी शहाणे बनली फिटनेस कोच


सामना ऑनलाईन । मुंबई

‘बिग बॉस’च्‍या घरामध्‍ये प्रवेश केल्‍यापासून मोहक किशोरी शहाणे आपली जादू पसरवत आहे. ती तिच्‍या फिटनेसप्रती असलेल्‍या निष्‍ठेसह आपल्‍याला प्रभावित करण्‍यासाठी कोणतीच कसर सोडत नाही. ‘बिग बॉस’मध्‍ये ती योगा करताना दिसत आहे. वूटच्‍या ‘अनसीन अनदेखा’च्‍या नवीन क्लिपमध्‍ये 51 वर्षीय अभिनेत्री दिगंबर नाईक व अभिजीत बिचुकलेला प्राणायाम शिकवताना दिसत आहे.

दिगंबर व बिचुकले गार्डनमध्‍ये गप्‍पा मारत आहेत आणि तेवढ्यात त्‍यांना किशोरी तिची नियमित योगासने करताना दिसते. दिगंबर तिला हाक मारतो आणि म्‍हणतो, ”बाहेर सोडायचं ना ते..?” किशोरी लगेचच त्‍याच्‍याजवळ बसून त्‍याला योगासनांची पद्धत व सूचना सांगण्‍याचा प्रयत्‍न करते आणि म्‍हणते, ”श्‍वास बाहेर सोडायचा असतो, करूया का?”

पहिल्‍यांदा दिगंबरला सराव करताना अस्‍वस्‍थ वाटते. तो किशोरीला त्‍याची पत्‍नी कशाप्रकारे योगा करते, पण त्‍याला त्‍याबाबत आवड नसल्‍याचे सांगतो. पण शेवटी तो किशोरीसाठी योगासन करण्‍याचे मान्‍य करतो. ती व दिगंबर योगासन करत असताना ती बिचुकलेला त्‍यांच्‍यासोबत सामील होण्‍यास सांगते आणि म्‍हणते, ”हे तुम्‍ही करू शकता, पाय दुखत असतील तरी.” झोपाळ्यावर झोके घेत असलेला बिचुकले उठतो आणि तिच्‍या सूचनांचे पालन करतो. खरंच ‘बिग बॉस’ घरामध्‍ये ही फिटनेस क्रांती तर नाही ना? किशोरी, तुला घरात सर्व स्‍पर्धकांना ही सवय अंगिकारण्‍यामध्‍ये प्रोत्‍साहित करण्‍यासाठी पाहताना खूपच रोचक वाटेल.