किचन टीप्स

 • मेथी धुतल्याकर थोडं मीठ लावून ठेवा.
 • तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला. तो पांढरा होतो.
 • रस्सा दाट, स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट, नारळाचा चव मिक्सरमधून काढून रश्श्यात घालावा.
 • कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते.
 • वरणासाठी डाळ शिजवताना एक चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी.
 • भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर ते भांडे थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवावे.
 • पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा. यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो.
 • सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रिजमध्ये ठेवा. मनासारख्या कापता येईल.
 • हाताला मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा.
 • हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा. त्यात लोहाचे प्रमाण वाढते.
 • पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा. पुर्‍या खुसखुशीत बनतील.
 • मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा.