टीप्स : स्वयंपाकीय सूचना

  • भजी करताना बेसनात काही थेंब लिंबाचा रस मिसळल्यास भजी कुरकुरीत आणि मस्त होते.
  • केक फ्रीजमध्ये ठेवल्यास तो सुकतो किंवा कडक होतो, पण केकसोबत ब्रेड स्लाईज ठेवल्यास केक ताजा राहतो.
  • केक किंवा बिस्कीट बनवताना दुधात भिजलेले काजू, बदाम लावा. बेक करताना ते निघणार नाहीत.
  • मैद्याच्या पिठात दूध घालून करंजी केल्यास करंजी पांढरीशुभ्र आणि खुसखुशीत होईल.
  • मिक्सरमध्ये खडा मसाला बारीक करताना त्यामध्ये थोडे मीठ घाला. त्यामुळे मसाला पावडर होणे सोपे होईल.
  • घरातील साजूक तूप फार जुने असल्यास ते गरम करून त्यात लिंबू पिळा. त्यामुळे त्याला ताज्या तुपाचा सुगंध येऊन ते खातानाही ताजे वाटेल.
  • खारी पुरीचे पीठ मळताना त्यात दही घालून मळल्यास पुर्‍या जास्त खुसखुशीत होतात.
  • टोमॅटो केचअप बनवताना त्यात द्राक्ष घाला. स्वादिष्ट होतो.
  • जॅम बनवताना त्यात दोन चमचे लिंबाचा रस मिसळावा. त्यामुळे जॅमला लवकर घट्टपणा येतो.
  • प्रवासाच्यावेळी डब्यात भाजी घेऊन जात असाल तर भाजीत थोडे व्हिनेगर घाला. भाजी जास्त वेळ राहील.