काजू लवकर खराब होतात, ‘या’ सोप्या टिप्सचा करा वापर

सुक्यामेव्यातील काजू हा असा पदार्थ आहे जो अनेकजण आवडीने खातात. अनेक गुणधर्मांनी समृद्ध असा हा पदार्थ शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतो, तसेच मेंदू आणि त्वचेचे आरोग्य निरोगी राहते, वजन नियंत्रणात राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. भारतातील आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओरिसा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये काजूचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. काजू असेच खाण्याव्यतिरिक्त ते विविध पदार्थांची चव वाढवण्यासाठीही वापरले जातात. बरेच लोक डेझर्ट, स्मूदी, करी आणि सॅलडमध्ये काजू वापरतात. पण काजू खूप दिवसांपासून असेच पडून राहिल्यास ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. यात काजूमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने ते खूप दिवस राहिल्यास त्याला कुबट वास आणि बुरशी येते. त्यामुळे घरातील काजूची शेल्फ लाइफ अर्थातच ते टिकवून ठेवण्याकरिता काही सोप्या टिप्सचा वापर करू शकता.

साठवण्यापूर्वी काजू व्यवस्थित भाजा
भाजलेले काजू चवीला स्वादिष्ट असतात, यात ते भाजल्याने त्यांची शेल्फ लाइफ वाढण्यास मदत होते. तसेच त्यातील ओलावा कमी होतो ज्यामुळे ते खराब होण्याची शक्यता कमी होते. यासाठी कढईत काजू भाजून घ्या, ते थोडे तपकिरी झाले की, प्लेटमध्ये काढून घ्या आणि व्यवस्थित थंड होऊ द्या. यानंतर ते एका घट्ट बरणीत साठवला.

हवाबंद डबा
काजूची टिकवण्याकरिता ते योग्य हवाबंद डब्यात साठवले पाहिजेत.हवाबंद डब्यात ठेवल्याने ते हवेच्या संपर्कात येण्यापासून रोखता येतात, ज्यामुळे ते लवकर खराब होत नाहीत.

झिप-लॉक बॅग
काजू साठवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे ते झिप-लॉक बॅगमध्ये ठेवणे. झिप-लॉक बॅगमध्ये घट्ट सील असते ज्यामुळे काजूला पटकन ओल पकडत नाही. ज्यामुळे काजू ताजे आणि कुरकुरीत राहतील. काजू साठवण्यासाठी फ्रेश झिप-लॉक बॅग वापरा.

थंड आणि कोरड्या जागी
काजूचे शेल्फ लाइफ वाढवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्यांना थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवत, कोरड्या आणि थंड जागी साठवा. उष्णतेमध्ये किंवा सूर्यप्रकाशात ठेवल्यास काजू लवकर खराब होण्याचा धोका वाढतो. त्यांचा पोत आणि चव टिकवून ठेवण्यासाठी ते स्वयंपाकघरातील पेंट्रीमध्ये साठवणे योग्य ठरते.

फ्रीजमध्ये ठेवा
जर तुम्ही नेहमी अनेक पदार्थांमथ्ये काजू वापरत असाल तर ते शक्यतो खोलीच्या तापमानावर ठेवण्यास काही हरकत नाही. पण जर तुमच्याकडे मोठ्याप्रमाणात काजू असतील आणि ते लवकर वापरण्याचे काही नियोजन नसेल तर ते हवाबंद कंटेरनमध्ये साठवून फ्रीजमध्ये ठेवणे चांगला पर्याय आहे.

हवाबंद कंटेनरमध्ये
जर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या पदार्थामध्ये काजू वापरत असाल तर ते खोलीच्या तापमानावर ठेवण्यास हरकत नाही. तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात काजू असतील आणि ते लवकरच वापरणार नसाल तर ते हवाबंद कंटेनरमध्ये साठवून फ्रीजमध्ये ठेवणे हा एक चांगला पर्याय असेल. यामुळे कित्येक महिने काजू चांगले राहतात.