बुलेट ट्रेनचं तिकिट किती आहे? वाचा

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

बहुचर्चित बुलेट ट्रेन प्रोजेक्टचं भूमिपूजन आज अहमदाबाद येथे झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ५०८ किमीचा मार्ग असलेला हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रोजक्टसाठी १,१०,००० कोटी रूपये खर्च होणार आहेत. यासाठी दरवर्षी २० हजार कोटी खर्च होणार आहेत. यासाठी जपान ८८ हजार कोटी रुपये कर्ज ०.१ टक्के व्याजाने हिंदुस्थानला देणार आहे. या कर्जाची मुदत ५० वर्ष असणार आहे. ही बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबई-अहमदाबाद हा प्रवास अवघ्या २-३ तासांत पूर्ण करता येणार आहे.

मुंबई-अहमदाबाद या मार्गावर एकूण १२ स्टेशन असणार आहेत. बांद्रा-कुर्ला, ठाणे, विरार, भोईसर, वापी, बिलिमोर, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती ही स्टेशन असणार आहेत. या बुलेट ट्रेनचा सर्वाधिक वेग ३२० किमी/तास असणार आहे. बुलेट ट्रेनचं प्रशिक्षण केंद्र वडोदरा येथे उभारण्यात येणार असून यामध्ये ४ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रोजेक्टमुळे जवळपास २० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

बुलेट ट्रेनच्या ट्रॅकचा ९६ टक्के म्हणजे ४६८ किमीचा मार्ग एलिव्हेटेड असणार आहे. २७ किमीचा मार्ग भुयारी तर १२ किमीचा मार्ग जमिनीवरून असणार आहे. या प्रोजेक्टसाठी जवळपास १२० लाख क्युबिक मीटर कॉन्क्रिट, ५५ लाख मेट्रीक टन सिनेंट आणि १५ लाख टन स्टील लागणार आहे. आता २०२२ मध्ये ही ट्रेन सुरू होणार हे तर कळलंच आहे मात्र याचं भाडं किती असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असले. तर या ट्रेनला साधारण भाडं २७०० ते ३००० असणार आहे. हाच प्रवास विमानाने करायचा असल्याच ३५०० ते ४००० खर्च येतो.

  • Nitin Jadhav

    eak number

  • Changonda Patil

    lot of talk of low interest loan and how it is almost free and all. But what about the the profit they will make in the entire project.