कोहलीचा काऊंटी क्रिकेट खेळण्याचा रस्ता साफ

विराट कोहली (हिंदुस्थान) - 10001* धावा (213 सामने, 205 डाव)

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंड दौऱयाच्या तयारीसाठी आयपीएलनंतर काऊंटी क्रिकेट खेळण्याचा ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीचा रस्ता आता साफ झाला आहे. कोहलीच्या काऊंटी क्रिकेट खेळण्यावरून बीसीसीआय दोन गटांत विभागले असले तरी ‘बीसीसीआय’ सीओए प्रमुख विनोद राय यांनी विराटच्या योजनेची पाठराखण केली आहे. इंग्लंडला जाऊन काऊंटी क्रिकेट खेळावे की अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव सामन्यात ‘टीम इंडिया’चे नेतृत्व करावे हा निर्णय कोहाली घेईल, असे राय यांनी स्पष्ट केले आहे.

विनोद राय म्हणाले, इंग्लंड दौऱयात पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या संघातील महत्त्वाच्या खेळाडूंनी इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळून आपली तयारी पक्की करायला हवी या निर्णयाप्रत सीओए आली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी आम्ही कुठल्याही खेळाडूला काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्यापासून रोखणार नाही. या कसोटी सामन्यासाठी श्रीलंकेविरुद्धचा संघ मैदानात उतरेल.

कोहलीपेक्षा उत्तुंग षटकार मारू शकतो – मोहम्मद शहजाद
अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद शहजाद याचे वजन ९० किलोपेक्षा जास्त असल्यामुळे त्याला पत्रकारांनी डाएटबद्दल विचारले असतो तो म्हणाला, जगातील नंबर वन म्हणून ओळखला जाणाऱ्या विराट कोहलीपेक्षा जास्त दूर आणि उत्तुंग षटकार मारण्याची क्षमता माझ्याकडे आहे. विराट कोहलीसारखा डाएट करण्याची गरज नाहीए. वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असेही तो म्हणाला. अफगाणिस्तानचा हा खेळाडू हिंदुस्थानात सराव करीत आहे.