निसर्गाकडे साद घालणारे अनोखे प्रदर्शन, कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचा उपक्रम


सामना ऑनलाईन । पनवेल

आज शहरी भागात निसर्गापासून पुरता अलिप्त झाला आहे. परिणामी शहरी मुले निसर्गातील घटकांबाबत अनभिज्ञ झाली आहेत. तसेच निसर्गातील या घटकांबरोबरचा आनंद अनुभवण्यापासून मुकत चालली आहेत. या शहरी भागातील लहान थोरांना चला निसर्गाकडे अशी पनवेल मधील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंदुबाई वाजेकर इंग्लिश मिडीयम शाळेने घातली आहे. निसर्गातील प्राणी, पक्षी, किटक आदींच्या सुमारे शंभरच्या आसपास विधार्थ्या प्रदर्शनातं सहभागी झाले होते.

पनवेल तालुक्यातील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंदुबाई वाजेकर या इंग्लिश मिडीयम स्कूल मधील सर्व शिक्षक –शिक्षकेतरांच्या सहकार्याने व मुख्याध्यापिका अंजली अ. उरेकर आणि मनीषा पाटील, मानसी कोकिळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्कूलमध्ये वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये वार्षिक क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन,  गोपाळकाला,  रक्षाबंधन,  नवरात्रोस्तव,  संक्रात अश्या विविध कार्यक्रमाची माहिती चिमुकल्याना कळावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या मुलांनी साकारलेल्या प्राणी संग्रहालयाचे प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यावेळी शंभर विध्यार्थ्यानी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला होता. यावेळी भाविका गायकवाड ह्या सिनियर केजी अ या विध्यार्थिनीनी जंगलाचे प्रतिकृती साकारून वाघ विश्रांती करीत असल्याचे साकारले होते.  त्याचबरोबर आज शनिवार (ता.४) रोजी सकाळी या स्कूलमध्ये इयत्ता पहिले ते चौथी पर्यंत निसर्ग परिसर या नावाने भारतातील निसर्ग, पर्यटन, या विषयावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन स्कूलचे चेअरमन व्ही. सी. म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या विध्यार्थानी जंगलाची प्रतिकृती साकारली होती.  दुसरीच्या श्रुती, दिशा, प्रियल, जतीन या मुलांनी भाजी मार्केट तयार केले होते.

कॅशलेस व्यवहाराचाही प्रदर्शनात छाप

कोकण एज्युकेशन सोसायटीच्या इंदुबाई वाजेकर या इंग्लिश मिडीयम स्कूल मधील इयत्ता तिसरीच्या मुलांनी कॅशलेस विषयावर प्रयोग सादर केला.त्यांनी बारकोडच्या मदतीने विना पैसाचे व्यवहार कसे शक्य आहेत. या विषयाचे प्रयोगाचे सादरीकरण केले. रोजच्या जीवनातील खरेदी- विक्री व बँकाच्या पैसामधून देण्या-घेण्यामधून या माध्यमातून सुटकारा मिळू शकतो असे या मुलांनी सांगितले.

विज्ञान प्रदर्शनात पर्यटन स्थळ 

इयत्ता चौथीच्या पाच डिव्हिजन पाच शिक्षकांच्या संकल्पनेतून भारतातील एकोणतीस राज्यातील पर्यटन स्थळाची माहिती मुलांना व्हावी याकरिता विध्यार्थानी वेशभूषा करीत एकोणतीस राज्यातील पर्यटनस्थळाची प्रतिकृती साकारली होती. यावेळी चौथीच्या जागृती आणि दिशा गायकवाड यांनी केरळ केरलीयंन वेशभूषा करीत त्या राज्यातील प्रसिद्द खाद्य इडली,डोसा,मेदुवडा या खाद्य पदार्थांचे सादरीकरण केले.