रत्नागिरीत मटक्याचा धंदा तेजीत

159

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी 

कोल्हापूरातील मटका व्यवसाय बंद झाल्यानंतर कोल्हापूरचे मटकेवाले रत्नागिरीत आल्याचे वृत्त दैनिक सामनाने प्रसिध्द करताच रत्नागिरीत आलेले कोल्हापूरचे मटकेवाले गायब झाले आहेत तर दुसरीकडे खेड येथे मटका व्यवसायिकांनी पत्रकारांना माराहाण केल्यानंतर रत्नागिरीतील मटका व्यवसाय तात्पुरता बंद झाला होता तो पुन्हा सुरु झाला.

कोल्हापूरातील मटका व्यवसाय बंद झाल्यानंतर काहींनी आपला मोर्चा रत्नागिरीत वळवला.व्यवसायाची गणिते रत्नागिरीत मांडत असताना दैनिक सामनाने भांडाफोड केली. दैनिक सामनात बातमी आल्याने एकच खळबळ उडाली आणि त्या मटकेवाल्यांनी पळ काढला. खेड येथे पत्रकारांना मटका व्यवसायिकांनी माराहाण केल्यानंतर प्रकरण पेटले. जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांनी माराहाणी विरोधात आवाज उठविल्यानंतर मटके वाल्यांचे धाबे दणाणले.

मिरकरवाडा,मुरुगवाडा बनतोय मटक्याचा अड्डा

रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणात मटका व्यवसायाची पाळेमुळे रूजली आहेत.पोलिसांचा धाक कमी झाल्याने रत्नागिरी शहरात मटका व्यवसायाने ‘बाळसं’ धरले.मटका व्यवसाय गेल्या काही वर्षात इतका तेजीत चालला की आकडे लावणारा आकडेमोड करीत कंगाल झाला तर मटका व्यवसाय करणारे बंगले बांधून चारचाकी अलिशान गाड्या फिरवू लागले. विशेष म्हणजे क्रीडास्पर्धा,”सांस्कृतिक” कार्यक्रमाचे प्रायोजक झाले. सुसंस्कृत रत्नागिरीत मटका व्यवसायाची किड वाढली आहे. खेड येथील प्रकरणानंतर मटका व्यवसाय तात्पुरता बंद आहे. तात्पुरता बंद असलेला मटका व्यवसाय कायमचा बंद करावा अशी मागणी रत्नागिरीतील नागरिक करीत आहेत. मिरकरवाडा,मुरुगवाडा मटक्याचे अड्डे बनत चालले आहेत

आपली प्रतिक्रिया द्या