कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणाचा युक्तीवाद पूर्ण

सामना प्रतिनिधी । नगर

कोपर्डी अत्याचार हत्या प्रकरणात अनेक दिलेल्या साक्षी या पडवुन दिलेल्या आहेत. घटनेचा पंचनामा ज्या ठिकाणी केला. व ज्यांची नोंद घेण्यात आली ती जागाच संबंधित मालकाची नाही याबाबतचे दाखल न्यायालयात सादर झाले आहेत. तपासणी अधिकार्‍यांच्या तपासात व पोलिस स्टेशनच्या डायरीमध्ये अनेक त्रूटी सिद्ध झाले आहेत. उलट तपासणीमध्ये अनेक साक्षीदारांनी मोघम उत्तरे दिली. ज्यांच्या साक्षी घेतल्या पाहिजे त्याच मुळात घेतल्या नाहीत त्यामुळे एकप्रकारे तयार करण्यात आलेल्या घटनाक्रम यात तफावत असल्याचे म्हणत आरोपी नितीन भैलुमेला केवळ गरीब दलित असल्यामुळे या गुन्ह्यात अडकविल्याचा युक्तीवाद आरोपीचे वकिल अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी आज न्यायालया समोर केला.

कोपर्डी खटल्यातील सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायाधिक सुवर्णा केवले यांच्या समोर सुरु आहे. अंतिम सुनावणीला सुरुवात होऊन आरोपी ३ च्या वतीने बाजु मांडण्यात येत आहे. पीडित मुलीच्या मैत्रीणीने जी साक्ष दिली. त्यात सुद्धा विसंगती आहे. तिची मैत्रीण १२ वी इयत्तेमध्ये शिकते. घटनेच्या पूर्वी आरोपींनी छेडछाड केली. असे तिने सांगितले मात्र ज्याची माहिती तिने इतरांना का दिली नाही. तीज घटनाक्रम व्यवस्थित सांगिते तर तिला वार, वेळ, दिनांक का सांगता येत नाही. हा मुद्दा आहे. शाळेत दोन दिवस गैरहजर राहिले तर विचारणा होती मात्र पीडित मुलीच्या गैरहजेरीबद्दल विचारणाच झाली नसल्याचा या साक्षीवरुन दिसून येत आहे. शाळेच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या त्रूटी आहेत त्यांचे दाखल न्यायालयात देण्यात आली. त्यामुळे ती गैरहजर राहते याबाबत शंका उपस्थित झाली आहे. घटनेतील आरोपी पप्पू शिंदे याने घेतलेली गाडी व दिलेले पैसे यामध्ये तपासात जे मुद्दे घेतले ते चुकीचे असून गाडी व्यस्थापकाने ४५ हजार रु. घेतले असे सांगितले. वरील पाच हजार रुपये कोणाकडून आणले याची नोंद आढळून येत नाही त्यामुळे इथेसुद्धा विसंगती आहे. जो मोबाईल आरोपी १ व ३ यांच्याकडे सापडला तो त्यांच्या नावावर आहे पण त्याचा वापर त्यांच्या घरचे करत आहेत. त्यामुळे घटनेच्या ठिकाणी मिसकॉल असल्याचे दर्शविण्यात आले. त्याचा अर्थ वेगळ्यापद्धतीने लावण्यात आला. व त्यानुसार त्यांची साखळी तयार करण्यात आली. वास्तविक पाहता घटनेमध्ये पीडित मुलीच्या आजूबाजूला राहणार्‍या नातेवाईकांची साक्ष घेण्यात आली. खटला सुरू असताना साक्षदार न्यायलयामध्ये येऊन त्यांना आरोपी माहित झालेले होते. हिीबाबसुद्धा आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे साक्षीदारांना न्यायालयात काय पुरावे द्यायचे त्यापेक्षा त्यांना जे पडवून दिले होते तेव्हडीच साक्ष द्यायची घटनेच्या दोन दिवस आगोदर पीडित मुलगी आजारी होती. मग तिला घरच्यांनी घराबाहेर का पाठवले. मसाला जर आणायचा होता तर अगोदर शेजार्‍यांकडे विचार झाली नाही. कारण साक्षीदार जे घेतले ते तिच्या घराशेजारचेच आहे. ते न करता तिच्या आईने तिला आजीकडे पाठवले. मग या तपासामध्ये त्या आजीची साक्ष का घेण्यात आली नाही. ती मसाला आणायला गेली हे सिद्ध होत नाही त्यामुळे आम्हासुद्धा आता तपासाबाबत शंका उपस्थित याबाबत झाली आहे. घटनेच्यावेळी आरोपी रस्त्याच्या बाजुला रेकी करत असल्याचा जबाब दिला मात्र तो सुद्धा ठोस असा पुराव न्यायालयासमोर आलेला नाही. पोलिस यंत्रणेने केलेला तपास व नोंदविलेल्या साक्षी यामध्ये उलट तपासणीमध्ये अनेक त्रूटी आढळून आलेल्या आहेत त्यामुळे घटनेचा विषय हा कशा पद्धतीने आखला गेला हे अनेक गोष्टीतून पुढे आल्याचा युक्तीवाद अ‍ॅड. आहेर यांनी केला. आरोपी घटनास्थळाजवळ असल्याचा एकही साक्षीदार नाही. अनेक साक्षीदारांच्या साक्षात एकवाक्यता नसल्यामुळे ते खोटे बोलत आहेत. वरिष्ठांच्या आदेशानेच तपास केला गेला. आरोपीची कुठलीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमीनाही त्याला शिक्षणांची ओढ असल्याने त्याने न्यायालयातही पुस्तके मिळावी असा अर्ज सुरुवातीला केला होता. या सर्व घटनाक्रमांचा अभ्यास केल्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक पाटोळे यांनी या गुन्ह्यातुन भैमुले यास वगळण्याची तयारी केली असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिली.

दरम्यान, या खटल्यातील आरोपी क्रमांक ३ नितीन भैलुमे यांचा युक्तीवाद संपल्यामुळे उद्या फक्त लेखी स्वरुनातले म्हणणे न्यायालयास सादर करणार आहेत.