कोळपेवाडी दरोडयातील 8 दरोडेखोरांना अटक

सामना प्रतिनिधी। कोपरगाव

१९ ऑगस्ट रोजी तालुक्यातील कोळपेवाडी येथील श्री लक्ष्मी ज्वेलर्स संगमनेरकर सराफ दुकानावर दरोडा पडला होता. यात दरोडेखोरांनी २८ लाख रुपयांचा माल लुटला होता. तसेच यावेळी दरोडेखोरांनी शाम सुभाष घाडगे यांची गोळ्या घालून हत्‍या केली होती. गेल्‍या १६ दिवसांपासुन पोलीस दरोडेखोरांचा कसून शोध घेत होते. पण अखेर स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण पथकाने ८ दरोडेखोरांना अटक केली आहे.

औरंगाबाद, सिल्लोड, बीड ,नेवासा ,नगर जालना या विविध ठिकाणावरून ८ दरोडेखांराना अटक केली असल्‍याची माहिती जिल्‍हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी कोपरगाव येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्‍यान या आरोपीवर पूलगाव ,लाड खेड ,यवतमाळ ,चंद्रपूर ,कमलेश्वर ,नागपूर येथे सहा विविध राज्यभरात १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्व आरोपींनी दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे . न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने त्यांना पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली.

दरम्यान, या दरोड्याच्या घटनेनंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. राज्यात कुप्रसिद्ध असलेल्या पपड्या उर्फ संजय उर्फ राहुल व्यंकटी उर्फ महादू उर्फ महादेव उर्फ गणपती काळे रा. वर्धा हा या टोळक्याचा प्रमुख होता. या टोळक्यात ८० आरोपी आहेत. त्यांची गुन्हे करण्याची पद्धती वेगवेगळी असून ते एकत्रित येऊन पाहणी करून गोळीबार, हाणामारी, फटाके फोडून दहशत माजवून लुटमार करतात या टोळीवर राज्यात व बाहेर विविध गुन्हे दाखल आहेत .अटक केलेल्या मध्ये किरण बंडू काळे (२३ ),अजय बंडू काळे रा. साईनाथनगर ,नागफणी वस्ती नेवासा , राजकुमार नारायण काळे (२० ) रा. सैलानी ता. चिखली जिल्हा बुलढाणा हल्ली मुक्काम नेवासा ,जितु रामदास भोसले (३९ ) रा. जोगेश्वरी ता. गंगापूर जिल्हा औरंगाबाद ,महेंद्र बाबूशा पवार (२१ ) रा. बोरखेड ता. जिल्हा बीड, विक्रम रजनीकांत भोसले (२२ ) रा. तांबे मळा ,बुरुडगाव रोड अहमदनगर ,अक्षय भीमा जाधव (२५ ) रा. सहचारी कोळपेवाडी कोपरगाव ,बुचा रामदास भोसले (४३ ) रा. बागेवा.

टोळीचा प्रमुख पपड्या हा नुकताच नागपूर कारागृहातून परोलवर सुटला होता . त्यावेळी त्याने २००६ -२००७ साली याच प्रकारचे ३७ साखळी गुन्हे केले व त्यातील टोळी पुन्हा एकत्र करून कोळपेवाडी येथे हा जीवघेणा दरोडा टाकळा होता.त्याच साखळी पपड्या विरुद्ध नगर ,पूलगाव ,लाड खेड ,यवतमाळ ,चंद्रपूर ,कमलेश्वर ,नागपूर येथे सहा गुन्हे दाखल आहेत .तर दुसरा आरोपी पप्या उर्फ प्रशांत उर्फ शेंडी रजनीकांत उर्फ, राजीकार्या भोसले याच्या वर विविध राज्यभरात १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर अजय बंडू काळे याच्या वर तीन गुन्हे दाखल आहेत.

कोळपेवाडी,सहचारी येथील अक्षय भीमा जाधव यांच्या कडे दरोड्याची संशयाची सुई फिरत असून जाधव याने या दरोड्यात आरोपींना काय काय मदत केली याबाबत कसून तपास सुरु आहे अशी माहिती तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली. या घटनेतील पापड्या काळेची सून मीनाक्षी काळे हिला दरोडा टाकण्यापूर्वी कोळपेवाडी माहेश्वर मंदिरात भिक्षा मागण्यासाठी ठेवली होते तिनेच या घटनास्थळी रेकी केली असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.