शिर्डी प्रांत व कोपरगाव तहसीलदार यांच्या सह्यांचे काम मंदावले, नागरिकांचा खोळंबा

54


सामना प्रतिनिधी । कोपरगाव

शिर्डी प्रांताधिकारी व कोपरगाव तहसीलदार यांच्या निवडणुकीमुळे बदल्या होणार असल्याने त्यांचे सह्यांचे काम मंदावली असून अनेक प्रकरणे व दाखले टेबलावर पडून असल्याने नागरिकांचा खोळंबा झाला आहे त्यामुळे पालक, विद्यार्थी, शेतकरी, व नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. बदली होईल तेंव्हा होईल पण टेबलावर असलेली प्रकरणे तर हातावेगळी करा अशी मागणी सर्वत्र होत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात येऊन 3 वर्ष पूर्ण झालेले तसेच जिल्ह्यातील रहिवासी असणार्‍या अधिकार्‍यांच्या बदल्यांची कामे फेब्रुवारी अखेर उरकण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे 3-4 वर्षांपासून जिल्ह्यात असलेल्या अधिकार्‍यांच्या बदल्या निवडणूकीपूर्वी होणार आहेत.निवडणूक आयोगाच्या बदली करण्याच्या निकषानुसार महसूल विभागातील 25 ते 30 वरिष्ठ अधिकारी बदलीस पात्र ठरत असल्याने त्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या होणार आहेत. त्यात प्रांत रविंद्र ठाकरे, यांच्यासह श्रीगोंदा, जामखेड, अकोले, राहाता, पाथर्डी हे 5 तालुके वगळता इतर 9 तालुक्यांतील तहसीलदार बदलीस पात्र आहेत. यात कोपरगाव तहसीलदार किशोर कदम यांचा समावेश असल्याने निवडणुकीपूर्वी त्यांच्या बदल्या होऊन नवीन अधिकारी जिल्ह्यात येणार आहेत. सरकारकडून कधीही याबाबतचे आदेश निघण्याची शक्यता आहे. बदली निश्चित असली तरी ती कोठे होणार याबाबतची टांगती तलवार अधिकाऱ्यांच्या डोक्यावर असल्यामुळे पासून क्रिमिलीयर तर तहसील कार्यालयात उत्पन्न व डोमासाईल हे दाखले सह्या साठी पडून आहेत त्यामुळे अनेकांचा खोळंबा झालेला आहे त्यामुळे बदली होईल तेव्हा होईल आहे त्या प्रकरणावर सह्या करून द्या , प्रांत व तहसीलदार यांनी गांभीर्याने विचार करून टेबलावर पडून असलेली प्रलंबित प्रकरणे ताबडतोब निकाली काढावीत अशी मागणी शेतकरी नागरिक पालक व विद्यार्थी वर्गातून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या