सुपर सिंधून रचला इतिहास; कोरिया ओपन सुपर सीरिजवर कब्जा

सामना ऑनलाईन । सेऊल

हिंदुस्थानी बॅडमिंटन सुपरस्टार पी. व्ही. सिंधूनं कोरिया ओपन सुपर सीरिजचं जेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात तिनं जपानच्या नेझोमी ओकुहाराचा २२-२०, ११-२१, २१-१८नं पराभव केला आहे. सिंधूनं ओकुहाराला पराभूत करत गेल्या महिन्यात वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पराभवाचा वचपा काढला आहे. यापूर्वी नोझोमी ओकुहारानं विश्व चॅम्पियनशिपमध्ये सिंधूचा पराभव केला होता

१९९१ साली सुरू झालेल्या कोरिया ओपन स्पर्धेत आजवर एकाही हिंदुस्थानी खेळाडूला आपली चमक दाखवता आली नव्हती. कोरिया ओपन स्पर्धेचं जेतेपद पटकावणारी सिंधू पहिली हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू ठरली आहे. जागतिक बॅडमिंटनमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या सिंधूनं गेल्या वर्षी चायना सुपर सिरिज जिंकली होती. या वर्षाच्या सुरुवातीलाच इंडिया सुपर सिरिज आणि सय्यद मोदी ग्रांप्री किताबही तिने पटकाविला होता. अशा प्रकारे २०१७ मधलं हे तिचं तिसरं सुपर सीरिज जेतेपद आहे.