लंडनमध्ये खलिस्तानींची हिंदुस्थानी दुतावासाबाहेर 8 जुलैला ‘किल इंडिया’ रॅली

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील हिंदुस्थानी दुतावास पेटवून दिल्याच्या आठवडाभरानंतर आता खलिस्तानी लंडन येथील दुतावासाबाहेर एक रॅली काढणार आहेत. किल इंडिया असे स्लोगन ठेवत ही रॅली काढण्यात येणार असून त्यासाठी इंटरनेटवरून पोस्टर्सही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 8 जुलैला ही रॅली काढण्यात येणार आहे.

या रॅलीसाठी सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे. ट्विटरवर अनेक अकाऊंट्स तयार करण्यात आले असून त्यावरून या रॅलीच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्या जात आहे. ”खलिस्तान फ्रिडम रॅली 8 जुलैला लंडन येथील हिंदुस्थान दुतावासाच्या बाहेर”, असे या ट्विट्समध्ये लिहण्यात आलेले आहे. त्यासोबतच शेअर केलेल्या पोस्टरवर इंग्लंडचे हिंदुस्थानी उच्चायुक्त विक्रम दोरायस्वामी व डॉ. शशांक विक्रम यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. त्या फोटोसोबत कॅनडा येथे झालेल्या हरदीप सिंग निज्जर यांचे मारेकरी असे लिहलेले आहे”,