मुंबईचा गोल्फादेवी संघ ठरला आमदार वैभव नाईक चषकाचा मानकरी

2

सामना ऑनलाईन। कुडाळ

कुडाळ येथील शिवसेना आमदार वैभव नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत गोल्फादेवी मुंबई शहर संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. तर न्यू हिंद विजय रत्नागिरी संघाने व्दितीय  क्रमांक पटकावला.  दोन्ही तुल्यबळ संघात झालेला अंतिम सामना  चुरशीचा ठरला. रविवारी रात्री उशिरा पर्यंत सुरु असलेल्या या स्पर्धेला क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रथम क्रमांकास रोख रुपये 51 हजार व आमदार चषक, व्दितीय  क्रमांकास 31 हजार रुपये व आमदार चषक,देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

युवक कल्याण संघ कणकवली व युवासेना कुडाळ आयोजित आमदार वैभव नाईक चषक राज्यस्तरीय निमंत्रित पुरुष गट कबड्डी स्पर्धा  कुडाळ येथील क्रीडा संकुल मैदानावर गेले तीन दिवस उत्साहात पार पडल्या. मुंबई ठाणे, रत्नागिरी , कोल्हापूर, सांगली कल्याण रायगड सिंधुदुर्ग याठिकाणचे 16  संघ स्पर्धेत  सहभागी झाले होते. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी रविवारी उपउपांत्य,उपांत्य व अंतिम सामने रंगतदार ठरले. गोल्फादेवी मुंबई शहर संघ व न्यू हिंद विजय रत्नागिरी संघाने  अंतिम सामन्यात मजल मारली. अंतिम सामन्यात गोल्फादेवी मुंबई शहर संघाने विजय संपादन करत आमदार चषकावर  आपले नाव कोरले.
 या स्पर्धेत तृतीय क्रमांक अमरभारत मुंबई संघ, चतुर्थ क्रमांक गुढीपूर कुडाळ संघ तर अष्टपैलू खेळाडू म्हणून कुलभूषण कुलकर्णी (रत्नागिरी), उत्कृष्ट पकड कल्पेश कडू व उत्कृष्ट चढाई सिद्धेश पिंगळे (मुंबई) यांची निवड करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक व मान्यवरांच्या  हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना  गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी शिवसेना युवासेना व  महिला आघाडीच्या पदधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
 यावेळी आ.वैभव नाईक,माजी जिल्हाप्रमुख  भाई गोवेकर,जि.प.सदस्य संजय पडते, नागेंद्र परब, हरि खोबरेकर,  सभापती राजन जाधव, तालुकाप्रमुख राजन नाईक, सचिन सावंत, राजू कविटकर, बाळा कोरगांवकर, बबन बोभाटे, सचिन कदम, गंगाराम सडवेलकर, सुशील चिंदरकर, राजू जांभेकर, संजय भोगटे, दिपक आंगणे, कृष्णा तेली,उदय मांजरेकर, नितीन सावंत, प्रसाद शिरसाट, राजू गवंडे, बंटी तुळसकर, मितेश वालावलकर, स्वप्नील शिंदे, बादल चौधरी, दिनेश चव्हाण, सुदीन पेडणेकर ,अक्रम साठी  सतीश कुडाळकर आदींसह शिवसेना  पदाधिकारी  कार्यकर्ते व कबड्डीरसिक  मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश पाटील,संदेश पारकर, मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर, अॅड.सुहास सावंत यांनी स्पर्धेला भेट देत शुभेच्छा दिल्या. आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत देवली (ता.मालवण) येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.