कुलभूषण जाधव प्रकरणी आवाज उठविणाऱ्या आसमा जहांगीर यांचे निधन

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानच्या प्रसिद्ध वकील आणि मानवी हक्क कार्यकर्त्या आसमा जहांगीर (६६) यांचे आज येथे हृदयविकाराने निधन झाले. हिंदुस्थानचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी त्यांनी पाकिस्तान सरकारविरुद्ध आवाज उठविला.

जाधव यांना हिंदुस्थानचा राजदूतवासाबरोबर संपर्क करू देण्यास पाक सरकारने परवानगी दिली नाही. असा विरोध करण्याचा सल्ला तुम्हाला कोणी दिला? तसेच हिंदुस्थानमधील तुरुंगामध्ये सुद्धा पाकिस्तानी नागरिक आहेत. जाधव प्रकरणात विरोध करून या पाकिस्तानी नागरिकांचे अधिकार आपण धोक्यात आणीत नाही का? आपण आंतरराष्ट्रीय कायदा बदलू शकतो का? असे रोखठोक सवाल त्यांनी पाक सरकारला केले होते.