Jadhav case : पाकड्यांच्या खोटारडेपणा उघड करत आहेत हरीश साळवे

सामना ऑनलाईन । हेग

आंतरराष्ट्रीय न्यायालयात सोमवारपासून कुलभूषण जाधव प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. ही सुनावणी 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या प्रकरणी हिंदुस्थानकडून हरीश साळवे बाजू मांडत आहे. तर पाकिस्तानकडून अटर्नी जनरल अन्वर मंसूर खान यांच्या नेतृत्वाखालचे पथक बाजू मांडणार आहे. सोमवारी 2.30 वाजता हिंदुस्थानने बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे. हिंदुस्थानकडे 5.30 वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. तर मंगळवारी पाकिस्तान त्यांची बाजू मांडणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 20 तारखेला संध्याकाळी 7.30 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत हिंदुस्थान बाजू मांडणार आहे. तर 21 तारखेला पाकिस्तान बाजू मांडणार आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाल्यापासून हरीश साळवे पाकड्यांचा खोटारडेपणा जगासमोर मांडत आहेत. कोणत्याही देशाने आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन करणे योग्य नाही. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले आहे. दोन्ही देशांनी सहमतीने या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हिंदुस्थानी नौदलाचे माजी अधिकारी कूलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवत त्यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षी सुनावली आहे. या निर्णयाविरोधात हिंदुस्थानने आंतराराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. व्हिएन्ना करारातील अटीशर्तींचा उल्लेख करत साळवे पाकिस्तानला घेरत आहेत. या कराराचे उल्लंघन करत पाकिस्तान हिंदुस्थानातली निष्पाप नागरिकांचा बळी घेत असल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे. जाधव यांना हिंदुस्थानशी संपर्क साधण्यास मनाई करणे आणि त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही, हे या कराराचे उल्लंघन असल्याचे साळवे यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तान जाधव यांच्यावर ठेवण्यात आलेल्या कोणत्याही आरोपांची माहिती देत नाही. त्यांच्यावर गंभीर आरोप असल्याचे सांगण्यात आले आहेत. ते कोणते आरोप आहेत, याची माहिती मिळाली पाहिजे. त्यांना कोणत्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली हे जगाला समजले पाहिजे, असे ते म्हणाले. पाकिस्तानने सार्क कराराचेही उल्लंघन केले आहे. तसेच जाधव यांना वकीलही उपलब्ध करून देण्यात आला नाही. ही गंभीर बाब असल्याचे साळवे म्हणाले. तसेच लष्करी न्यायालयाचा आदेशही पाकिस्तानने हिंदुस्थानला दिलेला नाही. त्यामुळे ह गंभीर प्रकरण गुलदस्त्यात ठेवण्याचे कारण काय असा सवालही त्यांनी केला. कूलभूषण जाधव निर्दोष असून त्यांना अयोग्य पद्धतीने या प्रकरणात गुंतवण्यात आल्याचा आरोपही साळवे यांनी केला. पाकिस्तानने दडपशाही करत जाधव यांच्याकडून गुन्हा कबूल करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आल्याकडे साळवे यांनी लक्ष वेधले. हिंदुस्थानने या प्रकरणी पाकिस्तानला 13 स्मरणपत्रे पाठवली. मात्र, पाकिस्तानकडून उत्तर आले नाही. त्यांनी या पत्रांचा उल्लेखही केला. पाकिस्तानने तीनवर्षे जाधव यांच्यावर अत्याचार केल्याचेही त्यांनी सांगितले. जाधव यांचे पाकिस्तानने अपहरण केल्याचे पुरावे हिंदुस्थानकडे आहे. तर पाकिस्तान बनाव रचत आहे. पाकिस्तानकडे जाधव यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. जाधव यांच्या सुरक्षेसाठी हिंदुस्थान सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.