कुलभूषण जाधव यांना पत्नीला भेटण्यास अनुमती

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेले हिंदुस्थानचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना त्यांच्या पत्नीला भेटू देण्यास पाकिस्तान आता राजी झाला आहे. जाधव दांपत्याला भेटीसाठी अनुमती दिल्याचे पत्र पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद येथील हिंदुस्थानी दूतावासाला धाडले आहे.

मानवतेच्या दृष्टिकोनातून त्या दोघांच्या भेटीला अनुमती देण्यात आली आहे, असे नमूद करतानाच जाधव दांपत्याची ही भेट पाकिस्तानातच होईल, असेही त्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.